Pune News: माण येथील लक्ष्मी चौकात अतिक्रमणे हटविली; अनेकांनी स्वतःहून अतिक्रमण काढले
Pune Development: हिंजवडी, माण-मारुंजी भागातील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला गती आली असून, लक्ष्मी चौक परिसरात पीएमआरडीएने कठोर पावले उचलली आहेत. काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून बांधकामे हटवली आहेत.
पिंपरी : हिंजवडी, माण-मारुंजी परिसरात पीएमआरडीएतर्फे सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत माण येथील लक्ष्मी चौक परिसरात कारवाई करण्यात आली. प्रशासनाच्या नोटिशींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अतिक्रमणे हटविण्यात आली.