'सोनू, तुला वीजबिल भरायचं नाय का?'

'सोनू, तुला वीजबिल भरायचं नाय का?'

पिंपरी :  अवाजवी वीजबिल भरण्यास ग्राहकांनी अनुत्सुकता दाखविल्याने शहरातील ४५ हजार ग्राहकांकडे तब्बल ६४ कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी महावितरण विभागाकडून मात्र ग्राहकांना एक आगळ्या-वेगळ्या पद्धतीने विनवणी केली जात आहे. चौकाचौकात उभे राहून कर्मचारी थकीत वीज बिल भरा, सोनू तुला वीजबिल भरायचे नाय का? अशी विनवणी ते संगीताच्या माध्यमातून करताहेत. थकीत वीजबिल भरण्यासाठी महावितरणचा अनोखा फंडा नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा ठरतोय. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा शिरकाव झाला आणि देश लॉकडाउन झाला. कंपन्या बंद झाल्या, व्यवसाय ठप्प झाले. तरी ही अनेकांना डोळे चक्रावणारी वीज बिल हातात पडली. आधीच लॉकडाउनमुळे प्रत्येकाला आर्थिक चणचण जाणवत होती. त्यात महावितरण विभागाने अवाजवी बिले दिल्याची धक्कादायक बाब समोर आली. यावरून ग्राहकांनी महावितरण विभागाच्या नियोजनशून्य कारभारावर बोट ठेवले. विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आणि महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. एकाही ग्राहकाने बिल भरू नये असे आवाहन विरोधकांनी केले. परिणामी वीज बिल थकीत राहिली. म्हणून शहरातील ४५ हजार ग्राहकांकडे ६४ कोटींची थकबाकी आहे. सरकारने थकबाकीदाराची वीज तोडणी करण्याचे आदेश दिले. राज्य सरकारच्या या आदेशावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ झाला. मग सरकारने तातडीने वीज तोडणीला स्थगिती दिली. पण अधिवेशन संपले त्याच दिवशी ही स्थगिती उठवून पुन्हा वीज तोडणीचे आदेश देण्यात आले. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खळखळाट आहे. तिजोरीत पुन्हा पैसा आणायचा असेल तर थकबाकी जमा करणे महत्त्वाचे आहे, असा दाखला देण्यात आला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विजेबाबत जनजागृती
शहरभर पुन्हा वीज तोडणी सुरू असताना पिंपरी चिंचवडमध्ये महावितरण विभागाने संगीतातून साकडे घालायला सुरुवात केली आहे. ग्राहकांनी वीज बिल का भरावे, याबाबत त्यांच्यात जनजागृती करीत शहरातील चौकाचौकात ही मोहीम राबवली जात आहे. कर्मचारी स्वतः वेगवेगळी गीत गाऊन सर्वांचे लक्ष वेधत आहेत. थकीत बिले भरण्यासाठी शहरात वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती केली जात आहे. त्याचाच हा एक भाग आहे. म्हणूनच महावितरण विभागाच्या या आगळ्या-वेगळ्या मोहिमेची सध्या शहरभर चर्चा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com