esakal | पिंपरी-चिंचवड : कोरोनासंबंधित प्रलंबित प्रस्ताव मंजूर, स्थायी समितीचा निर्णय 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड : कोरोनासंबंधित प्रलंबित प्रस्ताव मंजूर, स्थायी समितीचा निर्णय 
  • महापालिका स्थायी समितीचा निर्णय
  • जम्बो रुग्णालयासाठीही तरतूद 

पिंपरी-चिंचवड : कोरोनासंबंधित प्रलंबित प्रस्ताव मंजूर, स्थायी समितीचा निर्णय 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या खर्चाचे प्रलंबित प्रस्ताव महापालिका स्थायी समिती सभेने मंजूर केले. तसेच, वायसीएमसह ऑटो क्‍लस्टर येथे उभारलेल्या जम्बो रुग्णालयातील आयसीयू बेड व रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी आवश्‍यक कीट खरेदीसही मान्यता देण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे वाढलेला रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न महापालिकेकडून सुरू आहेत. त्यासाठी रुग्णालयांना आवश्‍यक साधनसामग्री पुरविण्याचे विषय स्थायी समोर होते. सभापती संतोष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने सभा झाली. मार्चपासून आतापर्यंत कोरोना रोखण्यासाठी केलेल्या खर्चांना कार्योत्तर मान्यता देण्यात आली. ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर येथे स्वखर्चाने उभारलेल्या दोनशे बेडच्या जम्बो फॅसिलिटी रुग्णालयासाठी जनरेटर बसविले आहेत. त्यांच्या खर्चासही मान्यता दिली. 

तरतूद वर्गीकरण विषय तहकूब 

महापालिकेच्या अर्थसंकल्पात आस्थापना लेखाशीर्षावर 58 कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यातील 25 कोटी 20 लाखांची तरतूद कोरोनासाठीच्या उपाययोजनांसाठी वर्ग करण्याचा प्रस्ताव होता. तो चार आठवडे तहकूब करण्यात आला. यात साफसफाई, जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट, वीजबिले, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना यांचा समावेश आहे. 

'स्थायी'ने मंजूर केलेले खर्च 

  • महापालिका रुग्णालये व रॅपिड अँटीजेन टेस्ट : 7 कोटी 48 लाख 
  • ऑटो क्‍लस्टर रुग्णालयासाठी जनरेटर सुविधा : 81 लाख 69 हजार 
  • बालनगरी रुग्णालयात ऑक्‍सिजन थेरपी यंत्रणा : 3 कोटी 25 लाख 
  • लिक्विड ऑक्‍सिजन टॅंक व पाइपलाइनसाठी : 2 कोटी 90 लाख 
  • शहरातील विविध विकास कामांसाठी : 65 कोटी 23 लाख 
  • पिंपळे सौदागर येथे पवना नदीवर पूल उभारणी : 12 कोटी 31 लाख