
सांगवीत सतरा फुट उंचीच्या विठ्ठल रखुमाईच्या मुर्ती दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जुनी सांगवी : रिमझिम पाऊस.. वातावरणातील गारवा..फुल पताका विद्युत रोषणाईने उजळून निघालेली मंदीरे आणी विठोबा रखुमाई जय जय रामकृष्ण हरीच्या गजरात जुनी सांगवी परिसरात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली. जुनी सांगवी येथील गजानन महाराज मंदिर,महादेव मंदीर, श्रीराम मंदीर,दत्त आश्रम याठिकाणी मंदीरांमधून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.गेली दोन वर्षांनंतर कोरोनामुळे सण उत्सवावर आलेले निर्बंधातून यावर्षी मोकळीक मिळाल्याने जुनी सांगवी परिसरात ठिकठिकाणी भाविकांसाठी फराळ, खिचडी वाटप करण्यात आले. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी प्रत्येक भाविकाला पंढरपुरला जाणे शक्य होत नाही.
ही भावना लक्षात घेऊन येथील प्रशांत शितोळे मित्र परिवाराच्या वतीने सतरा फुट उंच विठ्ठलाची मूर्ती व सोळा फुट रखुमाईची मुर्ती येथील अहिल्यादेवी होळकर चौकात दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. दर्शनासाठी फुलांची आरास केलेली पालखी ठेवण्यात आली होती. भगव्या पताकांनी चौकाचे सुशोभिकरण करण्यात आल्याने अहिल्यादेवी होळकर चौक लक्ष वेधून घेत होता.आलेल्या भाविकांना फराळ,केळी वाटपासह तुळस व विविध देशी झाड रोपांचे प्रसादासह वाटप करण्यात आले.बाळ गोपाळांसह महिला ज्येष्ठ नागरिक सांगवीकरानी आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी केली.प्रशांत शितोळे मित्र परिवार,शिवजिजाऊ महिला प्रतिष्ठाण यांच्यावतीने प्रशांत शितोळे,शितल शितोळे, पंकज कांबळे,सुषमा तनपुरे, उज्वला ढोरे, शिवाजी पाडुळे, वैशाली पवार,पोपट जम,आदींनी उत्सवाचे संयोजन केले.
Web Title: Ashadhi Ekadashi 2022 Crowd Of Devotees For Dardhan Of Seventeen Feet High Idol Of Vitthal Rakhumai Sangvi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..