Ashadhi Wari : आषाढी वारीसाठी आळंदीत आजपासून पर्यायी वाहतूक मार्ग

आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आठ जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
Sant Dnyaneshwar maharaj Palkhi

Sant Dnyaneshwar maharaj Palkhi

sakal

Updated on

पिंपरी - आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आठ जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. गांधीवाडा येथील पहिल्या मुक्कामानंतर या दोन्ही पालख्या नऊ जुलैला पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होतील. पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्दळ राहणार असून, यावेळी इतर वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासह पालखी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी देहू, आळंदी परिसरासह पालखी मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. हा बदल चार ते नऊ जुलै या कालावधीसाठी असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com