
पिंपरी : आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यामुळे शुक्रवारी (ता. २०) रस्ते वाहतूक आणि पीएमपीएलच्या बसगाड्या बंद असल्यामुळे नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला. पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी मार्गावर तीन लाख १९ हजार ६६ प्रवाशांनी प्रवास केला. मात्र, अचानक वाढलेल्या प्रवाशांमुळे नियोजन करताना मेट्रो प्रशासनाची दमछाक झाली.