esakal | पिंपरी : अशोक सर्वांगीण विकास बँकेचे संचालक अशोक शीलवंत यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी : अशोक सर्वांगीण विकास बँकेचे संचालक अशोक शीलवंत यांचे निधन

संत तुकारामनगर येथील अशोक सर्वांगीण विकास बँकेचे संचालक अशोक शीलवंत यांचे शुक्रवारी (ता. 9) सकाळी निधन झाले.

पिंपरी : अशोक सर्वांगीण विकास बँकेचे संचालक अशोक शीलवंत यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : संत तुकारामनगर येथील अशोक सर्वांगीण विकास बँकेचे संचालक अशोक शीलवंत यांचे शुक्रवारी (ता. 9) सकाळी निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा धर-शीलवंत यांचे ते वडील होत.

राज्य सरकारच्या सिटी सर्व्हे विभागातून गेल्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले. लोणावळा, पिंपरी, येरवडा, नागपूर, चंद्रपूर, घोडेगाव आदी ठिकाणी त्यांनी सेवा केली आहे. अशोक सर्वांगीण विकास सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी बोधीवृक्ष लावले आहेत. अनेक ठिकाणी अशोक स्तंभाची उभारणी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड शहरात पुणे-मुंबई महामार्गालगत पिंपरी चौकात महापालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारले आहे. या स्मारकाच्या आवारातही शीलवंत यांनी बोधी वृक्ष लावून अशोक स्तंभाची उभारणी केली आहे. अनेक नागरिक व आंदोलकांसाठी बोधीवृक्ष व अशोक स्तंभ प्रेरणादायी ठरत आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अशोक शीलवंत यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यात आहे. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन नोकरी निमित्त ते पिंपरी-चिंचवड शहरात आले. अशोक सर्वांगीण विकास सोसायटी व अशोक सर्वांगीण विकास बँकेची स्थापना केली. सामाजिक व साहित्यिक चळवळीतही ते सक्रिय होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोन महिन्यांपूर्वी अशोक शीलवंत व त्यांच्या पत्नीला कोरोना संसर्ग झाला होता. शीलवंत यांनी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यांच्या पत्नी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. दोघांनीही कोरोनावर मात केली होती. दीड महिन्यापूर्वी त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. परंतु, शीलवंत यांची प्रकृती नाजूकच होती. आज शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.