पिंपरीमध्ये इच्छुकांना आता सोसायट्यांची ‘चिंता’

मेळावे, बैठकी, समस्या निवारण शिबिरांचे आयोजन; मतदारांच्या गाठीभेटी सुरू
pimpri chinchwad
pimpri chinchwadsakal media

पिंपरी : महापालिका प्रभाग रचना अद्याप जाहीर झालेली नाही, निवडणुकीची तारीख निश्चित नाही, कोरोना व ओमिक्रॉनमुळे निवडणूक नियोजित वेळेत होईल की पुढे ढकलली जाईल, या बाबत अनिश्चितता आहे, असे असले तरी, इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. विशेषतः बहुतांश इच्छुकांनी सोसायट्यांमधील मतदारांवर लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसत आहे. कारण, सोसायटी स्तरांवर मेळावे, बैठकी, समस्या निवारण शिबिरे आयोजित केली जात आहेत.

गेल्या पाच वर्षांत शहराच्या विस्तारात मोठा बदल झाला आहे. २०१७ च्या निवडणुकीत शेती अथवा पडीक जमीन असलेल्या ठिकाणी आता टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. गृहनिर्माण सोसायट्या मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. काही सोसायट्यांमध्ये एक हजारांवर मतदार आहेत. विशेषतः समाविष्ट गावांमध्ये ही स्थिती आहे. त्यामुळे तेथील मतदारांची संख्याही वाढलेली दिसते. त्यांना आकर्षित करण्यासाठी व त्यांचे मतदान मिळवण्यासाठी अनेकांचा आटापिटा सुरू असलेला दिसतो.

काहींनी तर विविध विभागातील अधिकाऱ्यांची मार्गदर्शन शिबिरेच जणू आयोजित केली आहेत. त्यामाध्यमातून गृहनिर्माण संस्थेची स्थापना कशी करायची? रजिस्ट्रेशन कसे करायचे? सोसायटी ट्रान्स्फर डीड कसे करायचे? सेल डीड व कन्व्हेयन्स डीड कसे करायचे? कन्व्हेयन्स डीड न केल्यास काय समस्या येऊ शकतात?, त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?, सोसायटी सभासदांचे शेअर्स, जुनी सोसायटी असल्यास वाढीव एफएसआय कसा मिळवायचा? सोसायट्यांचे ऑडिट कसे करून घ्यायचे? मेंटनंन्स चार्ज कसा ठरवायचा? त्याची नियमावली काय आहे? अशा स्वरूपाचे मार्गदर्शन सोसायटीधारकांना केले जात आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत.

सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मेळावे, बैठकी, मार्गदर्शन शिबिरे घेतले जात आहेत. शिवाय, भविष्यात येणाऱ्या समस्या सोडविण्याचे आश्वासनेही दिली जात आहेत. कोरोनामुळे निधन झालेल्या मिळकतधारकांच्या नावावरील मिळकती वारसांच्या नावांवर कशा हस्तांतरित करायच्या याबाबतही मार्गदर्शन केले जात आहे.

pimpri chinchwad
राज्य प्रदर्शनासाठी २१ शाळांची निवड

तेव्हा मदत नाही, आता मीटिंग

आमच्या बिल्डिंगमध्ये पुरेसे पाणी येत नव्हते. बिल्डरही ऐकून घेत नव्हता. एका राजकीय नेत्याचे नाव सांगून आम्हाला गप्प करत होता. त्या नेत्याकडे तक्रार करूनही उपयोग झाला नाही. अखेर पोलिसांत फसवणुकीची तक्रार करू, असे सांगितल्यावर बिल्डरने तडजोड करून आमचा पाणीप्रश्न न अन्य समस्या सोडवल्या. आता तोच नेता मात्र सोसायटीत मीटिंग घ्यायचे म्हणतोय. आमच्या समस्या सोडवायलाही तयार आहे. पण, आता आम्हीच त्यांना गरज नाही म्हणून सांगतोय, असे एका सोसायटी सदस्याने सांगितले.

सर्वाधिक सोसायट्या

महापालिकेत १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांमध्ये गेल्या पाच-सहा वर्षांचे सर्वाधिक गृहनिर्माण सोसायट्या झालेल्या आहेत. यात तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, दिघी, रावेत, किवळे, मामुर्डी, वाकड, पुनावळे, ताथवडे, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, रहाटणी आदी भागात झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत चिखली प्रभाग एकमध्ये मतदारसंख्या तब्बल ३२ हजारांपेक्षा अधिक वाढली आहे. अशा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com