पिंपरी : ते दुचाकीवर बसले, अन् तितक्यात...

पिंपरी : ते दुचाकीवर बसले, अन् तितक्यात...

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना निगडीतील ओटास्कीम येथे घडली. मुन्ना शेख, छोट्या मगर (दोघेही रा. सम्राट हाउसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी), वसीम शेख (रा. नालंदा हाउसिंग सोसायटी, ओटास्कीम) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी युसूफ मेहबुब कोरबु यांनी फिर्याद दिली. 

फिर्यादी हे रविवारी (ता. 24) सायंकाळी पावणे आठच्या सुमारास अंकुश चौक येथे दुचाकीवर बसलेले असताना आरोपी त्याठिकाणी आले. फिर्यादीच्या भावासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी मुन्ना शेख व छोट्या मगर यांनी फिर्यादीवर कोयत्याने वार केला. तसेच, तेजस रघुनाथ धनवडे (वय 23, रा. राजहंस सोसायटी, ओटास्किम) यांना देखील आरोपींनी दगडाने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com