esakal | "मीच घरकुलचा डॉन आहे' म्हणत तेरा वाहनांची तोडफोड; तरूणावर प्राणघातक हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Assault on youth and Thirteen vehicles vandalized by goons In Chikhali pimpri

बुधवारी (ता.23) रात्री दहा ते अकराच्या दरम्यान इमारतीखाली आरडाओरडा सुरू असल्याने काय झाले आहे हे पाहण्यासाठी फिर्यादी हे खाली आले. त्यावेळी आरोपी हातात कोयता घेऊन "मी घरकुलचा डॉन आहे, माझ्या नादी कुणी लागू नका खल्लास करून टाकीन' अशी धमकी देत वाहनांची तोडफोड करत होता. 

"मीच घरकुलचा डॉन आहे' म्हणत तेरा वाहनांची तोडफोड; तरूणावर प्राणघातक हल्ला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : "आता मीच घरकुलचा डॉन आहे' असे म्हणत कोयत्याने तेरा वाहनांची तोडफोड करून तरूणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार चिखलीतील घरकुल प्रकल्पातील निसर्ग हौसिंग सोसायटीत घडला. या आरोपीवर चिखली पोलिस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहे. 

याप्रकरणी घरकुलमधील रहिवासी आकाश बालाजी गायकवाड (वय 29) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अठरा वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. बुधवारी (ता.23) रात्री दहा ते अकराच्या दरम्यान इमारतीखाली आरडाओरडा सुरू असल्याने काय झाले आहे हे पाहण्यासाठी फिर्यादी हे खाली आले. त्यावेळी आरोपी हातात कोयता घेऊन "मी घरकुलचा डॉन आहे, माझ्या नादी कुणी लागू नका खल्लास करून टाकीन' अशी धमकी देत वाहनांची तोडफोड करत होता. 

दरम्यान, फिर्यादी यांनी आरोपीला असे का करतोस असा जाब विचारला असता राग आलेल्या आरोपीने हातातील कोयता फिर्यादी यांच्या मानेवर मारायचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी तो चुकवला. त्यानंतर आरोपीने हातातील कोयत्याने सहा दुचाकी, 3 तीन चाकी, 4 चारचाकी अशा एकूण 13 वाहनांची तोडफोड केली. यात वाहनांचे एकूण 44 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर कोयता हातात घेऊन परिसरात दहशत माजविली. चिखली पोलिसांनी अठरा वर्षीय आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. 
या आरोपीवर चिखली पोलिस ठाण्यात लूटमार, हत्यार बाळगणे, हाणामारी, चोरी असे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत.