
पिंपरी : ॐ नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि। त्वमेव केवलं कर्तासि।...असे अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर, त्यानंतर केलेला शंखनाद आणि ‘मोरया मोरया’च्या जयघोषाने प्रफुल्लित झालेले वातावरण, असे चित्र बुधवारी (ता. १८) सकाळी मोरया गोसावी मंदिराच्या परिसरात अनुभवायला मिळाले. निमित्त होते श्रीमन् महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित अथर्वशीर्ष पठणाचे.