
पिंपरी : गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशिन फोडून दरोडा टाकणाऱ्या हरियाना राज्यातील टोळीतील दोन आरोपींना देहूरोड पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रंगेहाथ पकडले. घटनास्थळावरून मोटारीतून पसार झालेल्या त्यांच्या टोळीतील तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे. हा प्रकार मंगळवारी (ता. २७) पहाटे दोनच्या सुमारास देहूगाव येथील इंडसइंड बँकेच्या एटीएममध्ये घडला.