एकीकडे पोलिसांना प्रोत्साहन, तर दुसरीकडे हल्ल्यांचं सत्र कायम
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथे पोलिसावर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच बोपखेलमध्ये पुन्हा पोलिसांवर हल्ल्याची घटना घडली. नाकाबंदीच्या ठिकाणी तपासणीसाठी मोटार थांबविल्याच्या रागातून एकाने गोंधळ घालत पोलिसांवर हल्ला करीत पोलिसांच्या वाहनाची काचही फोडली. पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांत पोलिसांवरील हल्ल्याच्या दोन घटना घडल्याने नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
महेंद्र रविंद्र वाघमारे (वय 45, रा. रामनगर, बोपखेल) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार संजय कामठे यांनी फिर्याद दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. याठिकाणी चौकशी व वाहनांची तपासणी केली जात आहे. फिर्यादी व इतर पोलिस कर्मचारी रविवारी (ता. 10) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बोपखेल फाटा येथील नाकाबंदीच्या ठिकाणी कार्यरत होते. येथे वाहनांची तपासणी केली जात होती. दरम्यान, त्याठिकाणी आरोपीचीही मोटार तपासणीसाठी थांबविली. या रागातून आरोपीने फिर्यादीच्या तोंडात थापड मारली, तर पोलिस कॉन्स्टेबल उमेश जाधव यांना दगड फेकून मारीत धक्काबुक्की, शिवीगाळ करून इतरांनाही दगड मारण्याचा प्रयत्न केला.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पोलिस करीत असलेल्या सरकारी कामात त्याने अडथळा निर्माण केला. त्यामुळे दिघी पोलिस आरोपीला त्यांच्या वाहनातून पोलिस ठाण्यात नेत असताना आरोपीने वाहनाच्या खिडकीच्या काचेवर डोके आपटून काच फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. दरम्यान, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने दिघी पोलिसांनी आरोपीवर भादवि कलम 353 तसेच 332, 504, 188 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
बारा दिवसांपूर्वीच काळेवाडी येथे बंदोबस्तावरील पोलिसावर हल्ला झाल्याची घटना घडली. विनाकारण रस्त्यावर फिरत असताना हटकल्याने तिघांनी मिळून शंकर विश्वंभर कळकुटे या पोलिसावर हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी युनूस गुलाब अत्तार, मतीन युनूस अत्तार, मोईन युनूस अत्तार या तिघांना अटक केली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा पोलिसांवर हल्ला झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
कठोर शिक्षा व्हावी
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नाकाबंदीच्या ठिकाणी सध्याच्या कडाक्याच्या उन्हात पोलिस अक्षरश: वितळत आहे. मनुष्यबळ अपुरे असल्याने सुटी तर नाहीच, पण डबल ड्युटी करावी लागत आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चोवीस तास राबणाऱ्या पोलिसांवरच हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.