esakal | ओटा स्कीम हादरले ! खुनाची घटना ताजी असताना २४ तासातच प्राणघातक हल्ला

बोलून बातमी शोधा

crime news
ओटा स्कीम हादरले ! खुनाची घटना ताजी असताना २४ तासातच प्राणघातक हल्ला
sakal_logo
By
मंगेश पांडे

पिंपरी : निगडीतील ओटा स्कीम येथे टोळक्याने तरुणाचा खून केल्याची घटना ताजी असतानाच चोविस तासाच्या आतच आणखी एका तरुणावर टोळक्याने प्राणघातक हलला केला आहे. काही वेळेच्या अंतरातच घडलेल्या या दोन घटनांमुळे ओटा स्कीम हादरले आहे.

'काय रे कोठे चाललाय' असे विचारल्याने सहा जणांच्या टोळक्याने सोमवारी (ता. १९) रात्री पावणे नऊच्या सुमारास आकाश उर्फ मोन्या गजानन कांबळे (वय २४, रा. भीमनगर, पिंपरी) या तरुणावर चॉपर व कोयत्याने वार केले.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यासाठी ५,९०० रेमडेसिव्हिर

ही घटना निगडीतील ओटा स्कीम येथे घडली. यामध्ये गम्भीर जखमी झाल्याने आकाश यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोहेल संतोष जाधव (वय १८), हेमंत खंडागळे (वय १८), गणेश धोत्रे (वय १८), यश उर्फ गोंद्या खंडागळे (वय १९), वैभव वावरे (वय २१), श्रवण कुऱ्हाडे (वय १८, सर्व रा. पीसीएमसी कॉलनी, ओटा स्कीम, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

ही घटना ताजी असतानाच ओटा स्कीम येथे मंगळवारी (ता. २०) सकाळी पुन्हा रामा कांबळे या तरुणावरही टोळक्याने प्राणघातक हलला केला. या हल्ल्यातील आरोपी सोमवारी रात्री खून झालेल्या आकाश याचे मित्र आहेत. रामा यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, काही तासांच्या कालावधीत पाठोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे ओटा स्कीम हादरले आहे.

हेही वाचा: भोसेतील सर्व कुटुंबांची होणार कोरोना टेस्ट ! प्रसंगी होणार पोलिस बळाचा वापर