महापौर ढोरे म्हणतायेत, 'पिंपरी-चिंचवडमधील कोरोना स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न' 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन संदर्भातील बैठक पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. 25) झाली.

पिंपरी : पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन संदर्भातील बैठक पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. 25) झाली. त्यास महापौर उषा ढोरे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. शहरातील स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, त्यामध्ये यश येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बैठकीला कामगार व राज्य उत्पादन मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख आदी उपस्थित होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापौर ढोरे यांना कोरोनासंबंधी काय परिस्थिती आहे? आणि तुम्ही कसे नियोजन केले आहे? यासंबंधी विचारणा केली. त्यावर महापौर बोलत होत्या. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महापौर ढोरे म्हणाल्या, "महापालिकेच्या माध्यमातून कोविड संबंधी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस शहरातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी उपयुक्त असलेल्या रेमडेसिव्हिर या इंजेक्‍शनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरात सध्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम सुरू आहे. या अंतर्गत शहरातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. यासाठी प्रत्येक प्रभागानुसार स्वयंसेवक घरोघरीना भेटी देत असून, नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे." 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, गुरुवारी (ता. 24) जम्बो कोविड सेंटरमध्ये जाऊन महापौरांनी रुग्णांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. रुग्णांना वेळेत पाणी, चहा, नाश्‍ता, जेवण मिळते का, इथपासून सेंटरमधील स्वच्छतेची पाहणी केली. जम्बो कोविड सेंटरमध्ये सध्या 300 रुग्ण आहेत. ऑटो क्‍लस्टर सेंटरमध्ये 30 रुग्ण असून, तीन व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती ढोरे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attempt to control corona situation in pimpri chinchwad : mayor usha dhore