PCMC mayor politics
Sakal
पिंपरी-चिंचवड
PCMC Mayor Election : चिंचवड, भोसरीला पुन्हा की महापौरपद पिंपरीला? भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
Pimpri Chinchwad Mayor election: पिंपरी चिंचवडचे महापौरपद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे.
Pimpri News: पिंपरी चिंचवडचे महापौरपद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे चुरस वाढली असून, महापौरपदी कोण विराजमान होणार? गेल्या वेळेप्रमाणे भोसरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी अडीच-अडीच वर्षे भारतीय जनता पक्षाचे स्थानिक कारभारी वाटून घेणार, की पिंपरी विधानसभा मतदारासंघातील नगरसेवकांना संधी देणार?
खुल्या प्रवर्गातून विजयी झालेल्यांनाच संधी मिळणार की सर्वांमधून एकाची निवड करणार? पहिली अडीच वर्षे दोघांमध्ये विभागून देणार की तिथेही एकालाच संधी देणार... याकडे लक्ष लागले आहे.
