पिंपरी : रॅम्पमुळे नागरिकांचे दीड कि.मी. अंतर वाचणार

वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी एम्पायर इस्टेट येथील संत मदर तेरेसा उड्डाणपुलावरून चिंचवडगावात उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी दोन्ही बाजूस रॅम्प बांधण्यात येत आहे
pimpri
pimprisakal

पिंपरी : शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी एम्पायर इस्टेट येथील संत मदर तेरेसा उड्डाणपुलावरून चिंचवडगावात उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी दोन्ही बाजूस रॅम्प बांधण्यात येत आहे. या कामाचा प्रारंभ महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या रॅम्पमुळे नागरिकांचे दीड किलोमीटर अंतर वाचणार आहे.

pimpri
जनता वसाहतीमध्ये दिव्यांग महिलेवर सामुहिक बलात्कार

यावेळी उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, ‘ब’ प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेवक राजेंद्र गावडे, शैलेश मोरे, शीतल शिंदे, नगरसेविका अपर्णा डोके, अश्‍विनी चिंचवडे, जयश्री गावडे, कोमल मेवानी, स्वीकृत नगरसेवक अॅड. मोरेश्‍वर शेडगे, विठ्ठल भोईर, महिला मोर्चा अध्यक्षा उज्ज्वला गावडे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे, बापू गायकवाड, रवींद्र सूर्यवंशी, सुनील पवार, अशोक कुटे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

महापौर ढोरे म्हणाल्या, ‘‘रॅम्पमुळे नागरिकांच्या वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. शिवाय, दीड किलोमीटर अंतर वाचणार आहे. या रॅम्पचा चिंचवड, काळेवाडी, थेरगाव, रहाटणी येथील नागरिकांना फायदा होणार आहे.’’ रॅम्पसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल अभियंत्यांचा आणि रोहित मातेरे यांचा सत्कार करण्यात आला.

pimpri
कौटुंबिक वाद सुरू असलेल्या महिला होणार आणखी सक्षम

दरम्यान, चिंचवड लिंक रोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाजवळील प्रस्तावित पुलाची लांबी १४१.४७ मीटर असून, या पूलासाठी १५ कोटी ७९ लाख इतका खर्च येणार आहे. पुलाचे कामकाज १८ महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती अभियंत्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com