
पिंपरी : भोसरी, म्हाळुंगे एमआयडीसी व इतर भागात मोटारसायकली चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्यास अटक करून, त्याच्या ताब्यातून चोरीच्या एकूण ३ लाख ९० हजार रुपये किमतीच्या आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सागर भाऊसाहेब शिंदे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.