Chandrakant Patil : शिक्षणामध्ये संशोधन वृत्तीची गरज

मोशीतील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मुलींसाठींच्या फार्मा महाविद्यालयाच्या हाॅस्टेल व नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSakal
Summary

मोशीतील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मुलींसाठींच्या फार्मा महाविद्यालयाच्या हाॅस्टेल व नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.

भोसरी - देश श्रीमंत होण्यासाठी शिक्षणामध्ये संशोधनाची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. संशोधनाचे अधिकाधिक पेटंट विद्यार्थ्यांनी मिळविले पाहिजेत. त्यामुळे त्या पेटंटची राॅयल्टी जगभरातून आपल्याला मिळू शकेल. आपल्या देशाचा संरक्षणावरील खर्च ३५ टक्के असतो. त्यातही आपण ९० टक्के सामुग्री परदेशातून घेत होतो. मात्र आता याच्या उलट होऊन संशोधनामुळे संरक्षणाची सामुग्री आपण ९० टक्के देशातच तयार करू शकलो, हे संशोधनाचे महत्त्व आहे असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोशीत व्यक्त केले.

मोशीतील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मुलींसाठींच्या फार्मा महाविद्यालयाच्या हाॅस्टेल व नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे कार्याध्यक्ष डाॅ. गजानन एकबोटे होते. या वेळी आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर राहूल जाधव, माजी नगरसेविका अश्विनी जाधव, सामाजिक कार्यकर्ते निखील बोऱ्हाडे, सोसायटीचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. सुरेश तोडकर, डाॅ. निवेदिता एकबोटे आदी उपस्थित होते.

या वेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, 'काही शिक्षण संस्था प्रवेशासाठी डोनेशनच्या नावाखाली पालकांकडून मोठी रक्कम वसूल करतात. अशा संस्था संस्थाचालकांनी शैक्षणिक कार्यासाठी नाही तर व्यावसायिकतेसाठी सुरू केल्या आहेत. मात्र प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही शैक्षणिक कार्यासाठी सुरू करण्यात आली आहे.'

कार्यक्रमाची सुरवात वैष्णवी धायगुडे यांच्या इशस्तवनाने झाली. तर शेवट स्वप्निता कोळी यांनी पसायदानाने केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोसायटीच्या सहकार्यवाह डाॅ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले. स्वागताचे सूत्रसंचालन वृषाली तांबे यांनी केले. तर आभार प्राचार्य डाॅ. शशिकांत ढोले यांनी मानले.

Chandrakant Patil
Pimpri Crime : गाईंना गुंगीचे इंजेक्शन देऊन कत्तल करणाऱ्या टोळीवर 'मोका'

आमदार लांडगे यांची अशीही आठवण...

आमदार महेश लांडगे यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी प्रोग्रेसिव्ह सोसायटीच्या शिवाजीनगरमधील माॅडर्न कालेजमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. मात्र कमी गुण त्यात कोणाचीही शिफारस नाही आणि पैलवानगीचे अंग पाहून महाविद्यालयाने प्रवेश नाकारला. मात्र आता पालक त्यांच्या मुला-मुलींसाठी माॅडर्न कालेजमध्ये प्रवेशाच्या मागणीसाठी येतात आणि माझ्या शिफारशीने त्यांचे प्रवेश होतात याचा आज आनंद होत असल्याचे मत आमदार लांडगे यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com