'तुझे पिस्तूल खोटे आहे', एवढंच तो म्हणाला...मग काय थेट गोळीबारचं

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

तुझे पिस्तूल खोटे आहे', असे म्हटल्याने हवेत गोळीबार करून फरारी झालेल्या दोघांना भोसरी पोलिसांनी अखेर जेरबंद केले. वर्षभरापासून पोलिस आरोपींच्या मागावर होते. 

पिंपरी  : 'तुझे पिस्तूल खोटे आहे', असे म्हटल्याने हवेत गोळीबार करून फरारी झालेल्या दोघांना भोसरी पोलिसांनी अखेर जेरबंद केले. वर्षभरापासून पोलिस आरोपींच्या मागावर होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

रोहित नागेश गवळी (वय 30, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), अष्पाक अब्दुलरज्जाक सय्यद (वय 31, रा. श्रमिक वसाहत, येरवडा ) अशी आरोपींची नावे आहेत. मागील वर्षी रात्री पावणे बाराच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या मैत्रिणीसह पायी घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना अडविले. फिर्यादीने प्रतिकार केला असता आरोपीने पिस्तूल बाहेर काढले. त्यावर हे पिस्तूल खोटे असल्याचे फिर्यादी म्हणाले असता आरोपीने हवेत गोळीबार करून पसार झाले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वर्षभरापासून आरोपी फरारी होते. दरम्यान, हे आरोपी सोमवारी भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील मोकळ्या मैदानात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचला. मात्र, पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजताच आरोपी दुचाकीवरून पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करून आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhosari police arrested one by who shoot in air