Prakash Ambedkar : केंद्रातील सत्ता गेल्यास मोदीही जेलमध्ये जाऊ शकतात

उद्या केंद्रामधली सत्त्ता गेली तर, नरेंद्र मोदींनाही याचप्रमाणे जेलमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे मोदींनी जे पेरले आहे तेच उद्याच्या राजकारणाचा भाग होईल.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkarsakal
Summary

उद्या केंद्रामधली सत्त्ता गेली तर, नरेंद्र मोदींनाही याचप्रमाणे जेलमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे मोदींनी जे पेरले आहे तेच उद्याच्या राजकारणाचा भाग होईल.

भोसरी - चोरांना भिती असते. त्याच्यामुळे राजकारणातल्या चोरांना मोदी पकडतात. त्यांच पकडणं मी गैर मानतो. पकडायचे हे बरोबर आहे, मात्र पूर्णत्वास न नेता त्यांना तीन-चार वर्षे जेलमध्ये ठेवून भितीचे वातावरण निर्माण करायचं, हा सगळा भाग म्हणजे मानसिक दृष्टीकोनातून माणसे सक्षम नाहीत.

मात्र एवढं निश्चित आहे, उद्या केंद्रामधली सत्त्ता गेली तर, नरेंद्र मोदींनाही याचप्रमाणे जेलमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे मोदींनी जे पेरले आहे तेच उद्याच्या राजकारणाचा भाग होईल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी पिंपरीत सोमवारी (ता. ८) व्यक्त केले.

वडार समाजाने पिंपरीतील खराळवाडीत आयोजित केलेल्या वडार समाज महामेळाव्यासाठी आले असताना पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव, सर्वजीत बनसोडे, प्रा. एच. एन. नलावडे, प्रा. राजीव तारू, परेश शिरसिंगे, अनिल कुऱ्हाडे, श्याम पवार आदी उपस्थीत होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, 'कर्नाटकच्या सभेत दुभाषी माझ्या भाषणातील मोदी, भाजप शब्द भितीमुळे गाळत होता. मात्र; मी त्याला सांगितले की मोदी हे लोकांनी निवडून दिलेल्या माणसाचे प्रतिनिधी आहेत. खरे मालक हे मतदार आहेत त्यामुळे मतदारांनी घाबरू नये.'

मुख्यमंत्री पदावर अवलंबून...

अजित पवार भाजपात जातील का या प्रश्नाला उत्तर देताना देताना ॲड. आंबेडकर म्हणाले, 'कोणाला कधी कुठे मुख्यमंत्री पद चिटकेल त्याच्यावर अवलंबून आहे.'

वडार समाजाला सवलती मिळाल्या पाहिजेत

भटक्या विमुक्तांमध्ये वडार समाज हा चाळीस टक्के आहे. वडार समाजाची अवस्था ही खालवलेली आहे. शासनाने या समाजाला इतरांच्या बरोबरीने येण्यासाठी शिक्षणाच्या संधीबरोबरच कला जोपासणाऱ्या समाजाला कर्जाच्या रुपाने नाही तर; अनुदानाच्या रुपाने मदत केली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com