पिंपरी : 'या' कारणामुळे नगरसेवकाने दिली स्वत:च्याच मुलाला धमकी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

निवडणुकीवेळी मुलाच्या नावावर केलेले घर पुन्हा आपल्या नावावर करून देण्यासाठी नगरसेवकाने स्वतःच्याच मुलाला धमकी दिली.

पिंपरी : निवडणुकीवेळी मुलाच्या नावावर केलेले घर पुन्हा आपल्या नावावर करून देण्यासाठी भाजप नगरसेवकाने स्वतःच्याच मुलाला धमकी दिली. या प्रकरणी नगरसेवकाच्या पत्नीने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, या बाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

14 फेब्रुवारीला नगरसेवकाने आपल्या मुलाला धमकी दिली. "हे घर मी जागा घेऊन बांधले आहे. निवडणुकीच्या वेळी मी हे घर माझ्या नावावरून तुझ्या नावावर केले आहे. ते आता माझ्या नावावर परत कागदोपत्री करून दे, नाहीतर तुम्हाला भीक मागायला लावेल. तुम्हाला घरात व दिघी गावात राहू देणार नाही", अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या बाबत दिघी पोलिस तपास करीत आहेत. सदर नगरसेवक 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत दिघी येथील प्रभाग क्रमांक चारमधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp corporator threatened his own son at dighi pimpri chinchwad