अखेर भाजपकडून नगरसेवक संदीप वाघेरे यांना शिस्तभंगाची नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 July 2020

कोरोनासाठीच्या रुग्णालयात शिरून घातलेला धिंगाणा नगरसेवक संदीप वाघेरे यांना चांगलाच महागात पडला आहे.

पिंपरी : कोरोनासाठीच्या रुग्णालयात शिरून घातलेला धिंगाणा नगरसेवक संदीप वाघेरे यांना चांगलाच महागात पडला आहे. सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने त्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावून तीन दिवसांत खुलासा करावा अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. 

वायसीएम रुग्णालयातील राजकीय हस्तक्षेपाचा वैद्यकीय क्षेत्रातून असा निषेध

पिंपरीगाव येथील वाघेरे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात रविवारी मध्यरात्री गेले होते. त्यावेळी एका महिला रुग्णावरील उपचारात हयगय केली, असे म्हणत डॉक्‍टरांना शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यामुळे डॉक्‍टरांनी सोमवारी सकाळपासून काम बंद आंदोलन केले. डॉक्‍टरांच्या आंदोलनाची स्थानिक भाजप आमदार, महापालिका पदाधिकारी, आयुक्तांनी दखल घेऊन डॉक्‍टरांशी चर्चा केली. त्यांच्या मागण्यांवर योग्य तोडगा काढला. यानंतर आंदोलन मागे घेतले. या प्रकाराची पक्षाने गंभीर दखल घेतली. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, की कोविड महामारीत डॉक्‍टर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे वाघेरे यांचे डॉक्‍टरांना शिवीगाळ करण्याचे कृत्य चुकीचे आहे. त्यांच्या बेशिस्त वागण्यामुळे पक्षाची बदनामी झाली आहे. त्याच्या गैरवर्तनामुळे पक्षाला बाधा निर्माण होत असून, समाधानकारक खुलासा न आल्यास त्यांच्यावर पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच, यापुढे भाजप नगरसेवकांनी पक्षविरोधी काम केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp issues disciplinary notice to corporator sandeep waghere at pimpri chinchwad