esakal | पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदी भाजपचे केशव घोळवे बिनविरोध
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदी भाजपचे केशव घोळवे बिनविरोध

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निकिता कदम यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या उपमहापौरपदी सत्ताधारी भाजपचे केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली. 

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदी भाजपचे केशव घोळवे बिनविरोध

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निकिता कदम यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या उपमहापौरपदी सत्ताधारी भाजपचे केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी चिंचवडच्या उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी झाली. पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार पीठासन अधिकारी होते. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध असल्याचे सांगून  खेमणार यांनी अर्ज माघारी साठी पंधरा मिनिटांचा कालावधी दिला. भाजप उमेदवार घोळवे व सभागृह नेते नामदेव ढाके यांनी कदम यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना माघार घेण्याबाबत विनंती केली. अर्ज माघार घेण्याच्या मुदतीस चार मिनिटे बाकी असताना कदम यांनी माघार घेतली. त्यांनी माघार घेत असल्याबाबतचा अर्ज पीठासन अधिकाऱ्यांकडे सादर केला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हेही वाचा : मोबाईल टॉर्चच्या उजेडात ‘अंत्यसंस्कार’; निगडीतील अमरधाम स्मशानभूमीतील प्रकार..!