esakal | पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे नितीन लांडगे

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे नितीन लांडगे}

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे नितीन लांडगे विजयी झाले.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे नितीन लांडगे
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे नितीन लांडगे विजयी झाले. त्यांना 10 मते मिळाली; तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पंकज भालेकर यांना पाच मते मिळाली. अध्यक्षपदासाठी भाजपकडून रवी लांडगे इच्छुक होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्याच्या रागातून त्यांनी तडकाफडकी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यामुळे पक्षात दुही झाली असा दावा करून भाजपची काही मते आपल्याला मिळतील आणि आपला उमेदवार विजयी होईल, असा दावा राष्ट्रवादीने केला होता. यातूनच निवडणूक रंगतदार होईल, अशी शक्यता होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खबरदारी म्हणून भाजपने पक्षाद्येश (व्हीप) बजावला होता. तसेच, रात्री उशिरापर्यंत अनेक खलबते करून निवड बिनविरोध करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, राष्ट्रवादी ठाम राहिल्याने निवडणूक झाली. आज दुपारी बारा वाजता महापालिका सभागृहात मतदान प्रक्रिया झाली. यात भाजपला त्यांच्या सर्व सदस्यांची मते मिळाली. राष्ट्रवादीला स्वत:ची चार व शिवसेनेचे एक मत मिळाले.