bjp celebration in pimpri chinchwad
sakal
पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाने सत्ता राखली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहिला. अन्य पक्षांना फारसा प्रभाव दाखविता आला नाही. अनेक दिग्गजांना पराभवाचे धक्के बसले.
राष्ट्रवादी काँग्रेसची पंधरा वर्षांची सत्ता २०१७ मध्ये उलथवून भाजपने बाजी मारली होती. ती सल भरून काढण्यासाठी व महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत- लक्ष घातले. तरीही, त्यांना यश आले नाही. २०१७ पेक्षा त्यांना केवळ एक जागा अधिक जिंकता आली.