दृष्टीहीन रिना पाटील बनल्या 1 दिवसाच्या पोलिस आयुक्त 

Attempt to burn his wife who refused to go to his elder brother house for work
Attempt to burn his wife who refused to go to his elder brother house for work

पिंपरी : नागरिक व पोलिस यांच्यात असलेली भीतीची दरी कमी होऊन आदराची भावना वाढीस लागावी. तसेच नागरिकांना देखील पोलिसांची कर्तव्ये, शिस्तबद्ध काम, आव्हाने यांची ओळख व्हावी, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी 26 जानेवारी निमित्त सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाचा पोलिस अधिकारी बनविण्याचा उपक्रम राबविला. त्यात दृष्टीहीन असलेल्या रिना पाटील या एक दिवसाच्या पोलिस आयुक्त, एकल माता ज्योती माने अतिरिक्त आयुक्त तर विद्यार्थी दिव्यांशु तामचिकर पोलिस उपायुक्त बनले.

दुपारी एकच्या सुमारास हा सोहळा पार पडला. त्यावेळी पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात वरील तीनही विशेष अतिथी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनातून दाखल झाले. तेव्हा कृष्ण प्रकाश यांनी त्यांचं स्वागत केलं. तर पोलिस दलातील बँड पथकाने सलामी देत गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यानंतर तीघेहीजण कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांना सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या स्थानी विराजमान करत दैनंदिन कार्याला सुरवात केली

देवीच्या मंदिरात महिला पुजारीची मागणी; तृप्ती देसाईंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
दृष्टिहीन असलेल्या रिना पाटील यांना एक दिवसाचा पोलिस आयुक्त बनविण्यात आले. तसेच जिम ट्रेनरचे काम करणाऱ्या ज्योती माने यांच्याकडे एक दिवसासाठी अतिरिक्त पोलिस आयुक्त पदाचा पदभार सोपविण्यात आला. उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ यांचा देखील एक दिवसाचा पदभार विद्यार्थी दिव्यांशु तामचिकर याच्याकडे देण्यात आला.
शहर पोलीस दलातील सर्वोच्च स्थानी एक दिवसासाठी का होईना पण काम करता येत असल्याने एक दिवसाचे तीनही पोलिस अधिकारी भारावून गेले. या तिघांनाही कृष्ण प्रकाश, रामनाथ पोकळे यांनी पोलिसांचे काम समजावून सांगितले.

पोलिस आयुक्त झालेल्या रीना पाटील म्हणाल्या, “या क्षणाचा स्वप्नातही विचार केला नव्हता, आम्ही पूर्णतः अंध असल्याने फक्त पोलिसांबद्दल ऐकू शकतो. मात्र जे ऐकलं ते खरं निघालं. पोलिस खरेच सामान्य माणसाचे मित्र असतात. या पदाची सूत्रे स्वीकारल्यावर एक नक्की सांगावसं वाटतं कायदे कठोर आहेत पण त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे तरच महिला सुरक्षित राहतील.”

अपर पोलीस आयुक्त झालेल्या ज्योती माने म्हणाल्या, “पतीच निधन झाल्यानंतर समाजातील विकृत मानसिकतेचा परिचय झाला. अनेकवेळा हताश झाले. आज जेव्हा हा सन्मान स्वीकारला तेंव्हा अपप्रवृत्तीचा सामना करण्याची ताकद वाढली. कुठल्याही महिलेवर अन्याय झाल्यास तिनेही पोलिसांची मदत घ्यावी. ते आपल्यासाठीच असतात.”

पोलीस उपायुक्त (गुन्हे) झालेले दिव्यांशु तामचिकर म्हणाले, “ मी अभ्यास करून चांगल्या मार्कानी पास झालो. आता महाविद्यालयात जाईल. भविष्यात खूप मेहनत करून मी खराखुरा पोलिस अधिकारी म्हणूनच पोलिस मुख्यालयात दाखल होणार. मला आमच्या समाजाची मानसिकता बदलायची आहे.”

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले,  आम्ही ज्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उभे आहोत. त्यांनाही आमचे काम समजले पाहिजे आणि त्यांनीही आमच्या प्रति संवेदशीलता दाखवली पाहिजे. त्याच बरोबर समाजतील सर्व घटकांबरोबर आम्ही आहोत हे दाखविण्यासाठी हा उपक्रम घेण्याची ठरवलं ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com