महापालिकेच्या तरण तलावावर पोहण्यासाठी करा आता ऑनलाइन बुकिंग

उन्हाळा सुरु असल्याने महापालिकेच्या तरण तलावावर पोहण्यास येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.
Swimming Tank
Swimming TankSakal
Summary

उन्हाळा सुरु असल्याने महापालिकेच्या तरण तलावावर पोहण्यास येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.

पिंपरी - उन्हाळा सुरु असल्याने महापालिकेच्या तरण तलावावर पोहण्यास येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. परिणामी, महापालिकेने आज (ता.१८)पासून ऑनलाइन पद्धत सुरु केली आहे. महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळारील तरणतलाव नोंदणी या लिंकवर क्लिक करून बॅचचे आरक्षण करावे लागणार आहे.

महापालिकेच्यावतीने सध्या निगडी, पिंपळेगुरव, पिंपरीवाघेरे आणि कासारवाडी हे चार तरण तलाव नागरिकांना पोहण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. नेहरूनगर, यमुनानगर, संभाजीनगर येथील तलावात पाणी भरण्याची कार्यवाही सुरु आहे. पाणी भरताच पाणी शुद्धीकरण परिसर स्वच्छता, देखभाल व यांत्रिकी कामकाज सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर हे तीनही तलाव पोहण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहेत.

सध्या उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे तरण तलावावर पोहण्यास येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तलावावर गर्दीही वाढत आहे. तिकिटे घेण्यासाठी खिडकी जवळ खूप गर्दी होत आहे. प्रत्येक बॅचमध्ये तरण तलावावर क्षमतेप्रमाणे नागरिकांना पोहण्यासाठी प्रवेश दिला जातो. पण, ज्या नागरिकांना त्या बॅचमध्ये तिकीट मिळत नाही. ते नागरिक तक्रार करतात. त्यामुळे महापालिकेने ऑनलाइन पद्धतीने तरण तलावासाठी बॅचचे आरक्षण काढण्यास सुरवात केली आहे. पोहण्यासाठी ता. २१ ते २६ मे २०२२ या कालावधीतील पहिला पास धारकांची सकाळी ६ ते ७ ची बॅचच वगळता उर्वरित ७ बॅचचे आरक्षण आजपासून सुरु करण्यात आले.

‘असे’ करा ऑनलाइन बॅचचे आरक्षण!

-महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळारील तरण तलाव नोंदणी या लिंकवर क्लिक करणे

- पोहणाऱ्या नागरिकाने, पाल्याने, पालकांनी आपले नोंद खाते तयार करावे. ही प्रक्रिया एकदाच करावी लागेल

- नोंद केल्यानंतर लॉगइन करावे. इच्छित जलतरण तलाव निवडून तारीख, वेळ निश्चित करावी.

-पोहणाऱ्यांची संख्या जास्तीत-जास्त तीन लोकांची नोंद करु शकता.

- पोहणाऱ्या नागरिकाचा आधार नंबर या ठिकाणी नोंद करावा लागेल.

-यानंतर निवडलेल्या पोहणाऱ्यांच्या संख्येनुसार प्रत्येकी दहा रुपये या दराने ऑनलाइन पेमेंट करणे

-पेमेंट केल्यानंतर तो सीरियल नंबर हा लक्षा ठेवावा. निवडलेल्या तलावावर प्रवेशाच्या वेळेस हा नंबर संबंधित कर्मचाऱ्यांना सांगून आपली नोंद प्रमाणित करावी.

- तरण तलाव सरावासाठी ऑनलाइन पद्धतीने बॅचचे आरक्षण केल्यानंतर तलावावर येताना आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणणे बंधनकारक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com