
पिंपरी : ते दोघे भाऊ. पिंपरी कॅम्पानजिकच्या वैशालीनगरमध्ये राहणारे. महिन्यापासून एक कुत्र्याचे पिल्लू पाळलेले. पण, चार दिवसांपासून ते आजारी. घरगुती उपचार केले. फरक पडला नाही. सोमवारी दुपारपासून काही खाल्ले नाही. त्यात लॉकडाउन सुरू झाला. संचारबंदी लागू झाली. चौकाचौकात पोलिस बंदोबस्त. पिल्लाला दवाखान्यात न्यायचे कसे. दोघेही दुहेरी मनस्थितीत होते.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
एकीकडे कुत्र्याचे पिल्लू वाचवायचे आणि दुसरीकडे पोलिस. अखेर, त्यांनी मनाशी विचार पक्का केला आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा पशुवैद्यकीय दवाखाना गाठला. डॉक्टरांनी पिल्लाला तपासले. उपचार केले. औषधे दिली काही मेडिकल घ्यायची सांगितली. आणि ते घराकडे निघाले, पण...
गोपाळ बाविस्कर व गोविंद बाविस्कर, अशी त्या दोन भावांची नावे. पिंपरीतील वैशालीनगरमध्ये राहणारी. खराळवाडीतील पशुवैद्यकीय दवाखान्यातून ते बाहेर पडले. सोबत कुत्र्याचे पिल्लू होतेच. त्यांची दुचाकी अवघ्या पाच-सहाशे मीटरवर आली. पिंपरी चौकात. पोलिसांनी थांबवले. कुठे गेले होते? डबल सीट. ये घेरे त्यांना इकडे? पोलिसांचे हे प्रश्न कानावर पडले आणि ते दोघेही घाबरले.
कुत्र्याचे पिल्लू कुठून आणले? कुठे नेले होते? सर्व प्रश्नांचे शंका निरसन झाले. त्यांनी वस्तुस्थिती सांगितली. पोलिसांनाही ते पटले. त्यांनाही सहानुभूती वाटली आणि त्यांना जाऊ दिले. प्राणिमात्रांबाबतची भूतदया सामान्य तरुणांसह पोलिसांतही दिसली.
Edited by : Shivnandan Baviskar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.