esakal | इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून मुलाचा मृत्यू; पिंपरीतील घटना

बोलून बातमी शोधा

इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून मुलाचा मृत्यू; पिंपरीतील घटना}

खेळत असताना इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून मुलाचा मृत्यू; पिंपरीतील घटना
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : खेळत असताना इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना पिंपरी येथे बुधवारी (ता. २४) घटना घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अथर्व दीपक गावडे (वय १२, रा. कोहिनूर शांग्रीला, इंदिरा गांधी उड्डाणपुलाजवळ, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अथर्व, त्याचा भाऊ व आई घरात होते. दरम्यान, अथर्व व त्याचा भाऊ खेळत असताना अथर्व गॅलरीतून खाली पडला. गंभीर जखमी झाल्याने त्याला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.