मुलीच्या संगोपनावरून प्रियकराने केला प्रेयसीचा खून 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

  • गळा दाबून, दगडाने ठेचून मृतदेह टाकला खाणीत 

पिंपरी : प्रेमसंबंधातून जन्माला आलेल्या मुलीच्या संगोपनावरून सतत होत असलेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीचा खून केला. अपहरण करीत गळा दाबून, दगडाने ठेचून प्रेयसीला संपविले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खाणीत टाकल्याचा प्रकार देहूरोडजवळील किवळे येथे उघडकीस आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रिया शिलामन चव्हाण (वय 20, रा. आदर्शनगर, किवळे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी प्रशांत गायकवाड (वय 31, किवळे) विक्रम रोकडे (वय 33, रा. रहाटणी) याना अटक केली असून त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. याबाबत प्रिया यांच्या बहिणीने फिर्याद दिली आहे. प्रशांत विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तरीही त्याने प्रिया यांच्याशी मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवले त्यांना सहा महिन्यांची मुलगीही आहे. दरम्यान, प्रिया या देहूरोडला आदर्शनगरला माहेरी राहायच्या. मुलगी झाल्यानंतर प्रशांतने मुलीच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात सतत वाद होत. प्रिया वारंवार प्रशांतच्या किवळेतील घरी जाऊन वाद घालायच्या. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, शनिवारी (ता.25) पहाटे दोनच्या सुमारास प्रशांत हा प्रिया यांच्या माहेरी गेला. तेथे भांडण करीत जबरदस्तीने तेथून प्रिया यांना घेऊन गेला. प्रिया सकाळपर्यंत घरी न आल्याने त्यांच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून देहूरोड पोलिसांनी प्रशांत याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. प्रशांत हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला रहाटणी भागातून रविवारी (ता.27) पहाटे ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता गुन्ह्याची कबुली दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुलीच्या संगोपनावरून होणाऱ्या सततच्या वादातून प्रिया यांना आदर्शनगरमधील खाण परिसरात निर्जनस्थळी नेऊन तेथे गळा दाबून व दगडाने ठेचून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी साथीदारांच्या मदतीने मृतदेह खाणीच्या पाण्यात टाकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 1 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boyfriend kills girlfriend over daughter's upbringing in kiwale dehuroad