
मारहाण केल्याच्या रागातून सख्या भावाने मोठ्या भावाचा डोक्यात दगड घालून खून केला.
पिंपरी : मारहाण केल्याच्या रागातून सख्या भावाने मोठ्या भावाचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना निगडी येथे घडली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
विश्वनाथ सुरेश नाईकवडे (वय 35, संग्रामनगर झोपडपट्टी, रा. चिकन चौक, ओटास्कीम, निगडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सोमनाथ सुरेश नाईकवडे (वय 32) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मृत विश्वनाथ यांची आई सखुबाई नाईकवडे यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी सोमनाथ व विश्वनाथ हे दोघे सख्खे भाऊ आहेत. मृत विश्वनाथ याने दारू पिऊन निगडीतील काचघर चौकात आरोपी सोमनाथ याला मारहाण केली होती. या रागातून सोमनाथ याने निगडीतील खान्देश मराठा मंडळाजवळील रस्त्यावर बुधवारी (ता. 2) रात्री दहाच्या सुमारास विश्वनाथच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने विश्वनाथचा मृत्यू झाला.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली असता, त्यातील आरोपी सोमनाथ नाईकवडे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोन पथके तयार करून त्याचा शोध घेतला असता, चिंचवडमधील बिजलीनगर परिसरात तो सापडला. त्याच्याकडून कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अवघ्या सहा तासांत आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. अधिक तपास सुरू आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा