पिंपरी : बीआरटी मार्गातील वर्दळ जीवघेणी

ॲटोक्लस्टर ते काळेवाडी फाटा ‘बीआरटी’मध्येच रंगतोय गप्पांचा फड
BRT route kills BRT route between Atocluster to Kalewadi
BRT route kills BRT route between Atocluster to Kalewadisakal

पिंपरी : मार्ग क्रमांक ३८१ चिखली ते हिंजवडी फेज तीन या मार्गावर ॲटोक्लस्टर ते काळेवाडी फाटा दरम्यान बीआरटी मार्गावर एम्पायर इस्टेट, चिंचवड स्टेशन येथे नागरिक दैनंदिन फिरण्यासाठी, हवेशीर बसण्यासाठी परिवारासह जीव धोक्यात घालून बीआरटीएस मार्गाचा वापर करत आहेत. सायंकाळच्यावेळी भरधाव वेगाने पीएमपी वाहने बीआरटीमधून जात असताना अनेकांचे गप्पांचे फड या ठिकाणी जीव धोक्यात घालून रंगत आहेत. या प्रकारामुळे नकळत अपघातातून नागरिक बचावले आहेत. त्यामुळे, पीएमपी चालक व नागरिकांमध्ये वादविवादाचे प्रसंग घडत असल्याचे समोर आले आहे.

काळेवाडी बीआरटी मार्ग खूप दिवसांपूर्वी सुरू झाला असून, या मार्गावर सकाळी दोन गाड्यांच्या सहा ट्रीप अशा एकूण १२ फेऱ्या होत आहेत. रस्ता मोठा असून, मोकळा व व्यायामासाठी चांगला असल्याने नागरिक बिनधास्तपणे या मार्गावर फेरफटका मारण्यासाठी येत आहेत. या मार्गावर काम करणाऱ्या सेवकांना याचा मनस्ताप होत असून, वारंवार लोकांशी हुज्जत घालावी लागत आहेत.

एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचे काम झाल्यानंतर नागरीकांना फेरफटका व व्यायामासाठी पुरेशी जागा उरली नाही. काळेवाडी फाटा व ॲटोक्लस्टर जवळील नागरिक आजही बीआरटी मार्गाचा वापर करत आहेत. बीआरटी मार्ग सुरू झाल्यानंतर हा मार्ग काही दिवस बंद असल्याने नागरिकांना या मार्गाचा वापर करणे सोयीचे झाले आहे. त्यामुळे नागरिक बिनधिक्तपणे या मार्गाचा वापर करीत आहेत.

काही जण चक्क बीआरटी मार्गाच्या कडेला दुचाकी लावून गप्पा मारत आहेत. काही जण सायंकाळी मांडी घालून बीआरटी रस्त्यालगतच्या कट्ट्यावर बसत आहेत. त्यामुळे बस भरधाव आल्यानंतर नजरेसही पडत नाही. अशावेळी नागरीकांची उठून धावण्यास सुरुवात होत असल्याचे चित्र सध्या या मार्गावर दिसून येत आहे.

सध्या एम्पायर इस्टेटजवळील बीआरटी मार्गावर नागरिक गप्पा मारत बसत आहेत, सायंकाळी व्यायामासाठी या ठिकाणी जात आहेत. हे लक्षात आले आहे. नागरिकच याला जबाबदार आहेत. चालक वाहकांच्याही तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी लवकरच बूम बॅरिअर बसविले जाणार आहेत.

- दत्तात्रेय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com