- बेलाजी पात्रे
वाकड - राहुल कनगरे या तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला करत त्याच्या हाताचे पंजे तोडण्यात आले. या गुन्ह्यात वाकड पोलिसांनी तिघा आरोपींना केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे कारण देत २४ तासांच्या आत त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले. त्यामुळे वाकड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संतापलेल्या नातेवाईक-नागरिकांनी बुधवारी (ता. २५) वाकड पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.