Pimpri News : ठेकेदाराला अटक; अधिकाऱ्यांवरही गुन्हा, निगडीतील तीन कंत्राटी कामगारांच्या मृत्यूप्रकरणी अखेर कारवाई
Worker Death : निगडीतील बीएसएनएलच्या कामात तिघा कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर अखेर पाच दिवसांनी ठेकेदाराला अटक करण्यात आली असून पोलिसांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी : निगडी प्राधिकरणातील तीन कंत्राटी कामगारांच्या मृत्यूप्रकरणी अखेर पाच दिवसांनी ठेकेदाराला अटक करण्यात आली. ‘बीएसएनएल’ कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवरही निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.