मोदी सरकारच्या कानाखाली आवाज काढणे गरजेचे; धनंजय मुंडे कडाडले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 December 2020

आजची लोकशाही बदलली आहे. आज राज्यांमध्ये 64 आमदारांचा मुख्यमंत्री 54 आमदारांचा, उपमुख्यमंत्री 44 आमदारांचा मंत्री होतो आणि एकशे पाच आमदारांचा विरोधी नेता होतो.

भोसरी (पुणे) : आज कडाक्याच्या थंडीत देशातील शेतकरी दिल्लीमध्ये अन्यायकारक कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. मात्र भाजप सरकार शेतकऱ्यांच्या प्रामाणिक आंदोलनाला बदनाम करण्याचे काम करत आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. शेतकऱ्यांचा टाहो ऐकू न येणाऱ्या दिल्लीतील सरकारला खऱ्या अर्थाने श्रवण यंत्र देणे गरजेचे आहे. मात्र या यंत्राचा उपयोग झाला नाही, तर कानाखाली आवाज ही काढणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी भोसरीत व्यक्त केले.

सिंहगडावर पहिल्याच दिवशी हजार पर्यटक 

माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना श्रवण यंत्राचे वाटप करण्याचा कार्यक्रम भोसरीमधील लांडेवाडीतील राजमाता जिजाऊ प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शहराध्यक्षा वैशाली काळभोर विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, नगरसेवक अजित गहाणे, नगरसेवक संजय वाबळे, नगरसेवक विक्रांत लांडे, नगरसेवक प्रविण भालेकर, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, धनंजय भालेकर, मनिषा गटकळ, नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत आदी उपस्थित होते.

पुणे, पिंपरी-चिंचवड बाहेरील प्रवाशांनो इकडे लक्ष द्या, पीएमपीचे 12 मार्ग सुरू होणार

मुंडे पुढे म्हणाले, ''आजची लोकशाही बदलली आहे. आज राज्यांमध्ये 64 आमदारांचा मुख्यमंत्री 54 आमदारांचा, उपमुख्यमंत्री 44 आमदारांचा मंत्री होतो आणि एकशे पाच आमदारांचा विरोधी नेता होतो. ही लोकशाहीची किमया आमचे आदरस्थान शरद पवार साहेबांनी करून दाखवली.'' 

जयंत पाटील म्हणाले की, ''निवडणुकीमध्ये निवडून येणं सोपं असतं, पण निवडून आल्यावर जनतेसमोर कामं उभी करण अवघड असते. डॉ. कोल्हे यांनी मागील २० वर्षापासून मतदारसंघात प्रलंबित असणारा नाशिक-पुणे महामार्ग रस्ता रूंदीकरण प्रश्न मार्गी लावला आहे.''

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकरी आंदोलकांविषयी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चूकीच्या विधानाबद्दल उपमहापौर घोळवे यांचा समाचार घेतला. 'आजचा श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम योग्य ठिकाणी होत आहे. याची खरी गरज सत्ताधाऱ्यांना आहे.'

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cabinet Minister Dhananjay Munde criticized central government over farmers agitation