esakal | Pimri : चिंचवडमध्ये मोटार उलटली
sakal

बोलून बातमी शोधा

PIMPRI

चिंचवडमध्ये मोटार उलटली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : चिंचवड लिकरोड येथे भरधाव मोटार उलटल्याची घटना सोमवारी (ता. ४) दुपारी घडली. यामध्ये एक जण जखमी झाला. या घटनेमुळे या मार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मोटारचालक लिंकरोडने जात असताना दर्शन हॉलजवळील रस्त्यावर मोटार अचानक उलटली.

आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनस्थली धाव घेत चालकाला मोटारीची काच फोडून बाहेर काढले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी काही वेळाने मोटार बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली.

loading image
go to top