पिंपरी-चिंचवडकरांनो, कोणाला लिफ्ट देण्याच्या विचारात असाल तर थांबा!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 February 2021

  • डोक्‍याला पिस्तूल लावून जिवे मारण्याची धमकी 
  • पुनावळेत भरदिवसा घडली घटना 

पिंपरी : कामावर जात असताना एकाला लिफ्ट दिली. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर लिफ्ट दिलेल्या व्यक्तीनेच कारमालकाच्या डोक्‍याला पिस्तूल लावून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, त्याच्या साथीदारांनी कारमालकाला जबरदस्तीने बाहेर ओढून मागे बसण्यासाठी धमकाविले. हा प्रकार पुनावळे येथे भरदिवसा घडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुरेशचंद्र जोशी (वय 44, रा. फेज 1, पुनाविले सोसायटी, पुनावळे, मूळ-उत्तरांचल) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे सोमवारी (ता. 8) सकाळी पावणेनऊच्या सुमारास त्यांच्या कारमधून कामावर निघाले होते. दरम्यान, पुनाविले सोसायटीसमोर खाकी कपडे परिधान केलेल्या व हातात काठी असलेल्या व्यक्तीने लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने फिर्यादीची कार थांबविली. 

अनेकांची स्वप्ने भुईसपाट; भोसरी रेडझोनमधील बांधकामांवर मोठी कारवाई

फिर्यादीने त्याला कारमध्ये घेऊन जाताना साई शॉपिंग सेंटरसमोर त्याने कार थांबविण्यास सांगितले. फिर्यादीने कार थांबविली असता, आरोपीने त्यांच्या डोक्‍याला व पोटाला पिस्तूल लावून जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी आरोपीचे आणखी तीन साथीदार तेथे आले. त्यातील एकाने फिर्यादीला जबरदस्तीने कारमधून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. तसेच, कारमध्ये मागे बसण्यासाठी धमकाविले. मात्र, फिर्यादी कारमध्ये न बसता स्वतःची सुटका करून तेथून पळत सुटले. अर्धा किलोमीटर गेल्यानंतर काही वेळाने पुन्हा कारजवळ आले असता, आरोपी कार तेथेच सोडून पसार झाले होते. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: car owner threatened by one at punawale pimpri chinchwad