नूतन अभियांत्रिकीमध्ये 
विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

नूतन अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

तळेगाव दाभाडे, ता. ८ ः महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी विनामूल्य चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. प्रस्तावना डॉ. शेखर रहाणे यांनी केली. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त महेश शहा, सोनबा गोपाळे, अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. विलास देवतारे, एनसीईआरच्या प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे, नवीन समर्थ महाविद्यालयाच्या प्राचार्या वासंती काळोखे आदी उपस्थित होते. बारावी सायन्स नंतरचे विविध करिअरची अचूक निवड, अभियांत्रिकी तसेच विविध विभागांतील प्रवेशप्रक्रिया मार्गदर्शन, विविध शाखांमधील संधी आदी विषयांवर प्रा. शंकर उगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी नंतरच्या करिअर संधी, व्यवसाय मार्गदर्शन, शाखेची निवड, महाविद्यालय निवडीमधील निकष या विषयांवर डॉ. विलास देवतारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन वासंती काळोखे यांनी केले. नियोजन प्रा. प्रतीक्षा तनपुरे, प्रीती घुले यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com