Sakal Vidya : ‘अभियांत्रिकी, वैद्यकीय करिअर’विषयी रविवारी चर्चासत्र

अकरावी, बारावी ही दोन वर्षे विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यामधील महत्त्वाची वर्षे आहेत.
Sakal Vidya
Sakal Vidyasakal
Updated on

पिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी (ता. ३०) ‘सकाळ विद्या’ व मनोज चौधरी मॅथ्‍स ॲकेडमीच्यावतीने अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि विज्ञान क्षेत्रातील करिअर, प्रवेश परीक्षांबाबत मार्गदर्शन चर्चासत्र आयोजित केले आहे. यामध्ये अभियांत्रिकी व मूलभूत विज्ञान शाखेत शिक्षण घेण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षा आणि ‘आयआयटी’साठी कशी तयारी करावी?, या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

अकरावी, बारावी ही दोन वर्षे विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यामधील महत्त्वाची वर्षे आहेत. अभियांत्रिकीसाठी द्याव्या लागणाऱ्या राज्य पातळीवरील सीईटी आणि देश पातळीवरील जेईई व वैद्यकीयसाठी नीट परीक्षा आहेत.

त्यावर मनोज चौधरी मॅथ्‍स ॲकॅडमीचे संस्थापक-संचालक मनोज चौधरी हे विद्यार्थ्यांना जेईई, नीट आणि सीईटी सारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना सलग १० तास अभ्यास कसा करावा? हे सातत्य कसे ठेवावे? यासाठी अभ्यासाचे यशस्वी नियोजन कसे करावे? याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

अकरावीला प्रवेश घेतल्यावर सीईटी करावी की जेईई? यातील नक्की फरक काय? बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही यातील मूलभूत फरक ही माहीत नसतो. त्यामुळे अनेकदा गोंधळ होतो. त्याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

चर्चासत्राविषयी...

कधी - रविवारी, ३० मार्च २०२५

केव्हा - दुपारी १२ वाजता

कुठे - प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह प्रेक्षागृह, चिंचवड

वक्ते - मनोज चौधरी आणि ओमप्रकाश मरे

कुणासाठी - अकरावी, बारावी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी

विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य

अधिक माहितीसाठी संपर्क - ९७३०९५९६९९, ९३०७७१५९०३

अभिनव प्रयोगाबद्दल

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडसर ठरणारा मोबाईल आणि सोशल मीडिया यावर ‘डिजिटल डिटॉक्स’बद्दल केलेल्या अभिनव प्रयोगाबद्दल मनोज चौधरी हे संवाद साधणार आहेत. परीक्षेचे योग्य नियोजन, विद्यार्थ्यांना येणाऱ्या मानसिक अडचणी व त्यावर कशी मात करता येतील? याबद्दलही माहिती देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com