esakal | "मी इथला भाई आहे' अशी धमकी देत मागितली खंडणी 
sakal

बोलून बातमी शोधा

A case has been registered against the two for demanding ransom at Dighi police station


फिर्यादी यांचे गणेशनगर येथे दुकान असून शुक्रवारी (ता.20) सायंकाळी साडेचारच्या सुमारास आरोपी त्यांच्या दुकानात शिरले. "मी इथला भाई आहे' अशी धमकी देत फिर्यादी यांच्याकडे दोन हजारांची खंडणी मागितली. 

"मी इथला भाई आहे' अशी धमकी देत मागितली खंडणी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : "मी इथला भाई आहे' अशी धमकी देत खंडणी मागणाऱ्या दोघांवर दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बोपखेल येथे घडला. 

 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनिकेत जोगदंड, संतोष गिरी (दोघेही रा. बोपखेल) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विरेंद्रसिंह विक्रमसिंह कतनेरीया (रा. बापुजीबुवा मंदिराशेजारी, माळवाडी, कळस, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिर्यादी यांचे गणेशनगर येथे दुकान असून शुक्रवारी (ता.20) सायंकाळी साडेचारच्या सुमारास आरोपी त्यांच्या दुकानात शिरले. "मी इथला भाई आहे' अशी धमकी देत फिर्यादी यांच्याकडे दोन हजारांची खंडणी मागितली. त्यास फिर्यादी यांनी नकार दिल्याने आरोपींनी त्यांना बेदम मारहाण करीत धमकी दिली. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.