'त्या' तरुणीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल; पिंपळे सौदागर खूनप्रकरण 

'त्या' तरुणीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल; पिंपळे सौदागर खूनप्रकरण 
Updated on

पिंपरी : पिंपळे सौदागर येथील तरुणाच्या खून प्रकरणात एका तरुणीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. 

विराज विलास जगताप (वय 18, रा. पिंपळे सौदागर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी हेमंत कैलास काटे, सागर जगदीश काटे, कैलास मुरलीधर काटे, जगदीश मुरलीधर काटे (सर्व रा. पिंपळे सौदागर) यांना अटक केली असून, आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. मृत विराज याचे आरोपींच्या नातेवाईक तरुणीशी प्रेमसंबंध होते. या कारणावरून आरोपींनी आपआपसात संगनमत करून रविवारी (ता.7) रात्री दहाच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे विराज हा दुचाकीवरून जात असताना त्याच्या दुचाकीला टेम्पोने पाठीमागून धडक दिली. तो खाली पडल्यानंतर हेमंत काटे याने लोखंडी रॉड विराजच्या डोक्‍यात मारला. तर सागर काटे याने पाठीत दगड मारला. कैलास काटे, जगदीश काटे व अन्य दोघांनी विराजचे हातपाय पकडले. त्यावेळी जगदीश काटे म्हणाला की, तू खालच्या जातीचा आहे. तुझी लायकी आहे का आमच्या नातेवाईक मुलीवर प्रेम करायची, तरी तू तिच्यावर प्रेम करतो का' असे जातीवाचक बोलत तो विराजच्या अंगावर थुंकला. त्यास जबर मारहाण करून तेथेच सोडून दिले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या घटनेत गंभीर जखमी झाल्याने विराजला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सोमवारी (ता.8) दुपारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी ऍट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. मृताच्या नातेवाइकांसह विविध संस्था, संघटनांनी पोलिस अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांची भेट घेत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच विविध नेत्यांनी जगताप कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, काही समाजकंटक जाणीवपूर्वक जातीय सलोखा बिघडविण्याकरिता प्रक्षोभक, चिथावणीखोर पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करीत आहेत. अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. तसेच मृताचे नातेवाईक व ग्रामस्थांनीही बैठक घेत कोणीही जातीय तेढ निर्माण न करण्याचे आवाहन केले. तरीही काही समाजकंटकांकडून एका तरूणीचे फोटो सोशल मिडियावर जाणीवपुर्वक अपलोड करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. 

कठोर कारवाई होणार 

या खून प्रकरणातील सहा आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी तत्काळ अटक केली असून, हे आरोपी सध्या पोलिस कस्टडीमध्ये आहेत. या गुन्ह्याचा तांत्रिक व शात्रोक्त पद्धतीने सखोल तपास केला जात आहेत. तरी या प्रकरणात काही समाजकंटक जाणीवपूर्वक जातीय सलोखा बिघडविण्याकरिता प्रक्षोभक, चिथावणीखोर पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करीत आहेत. या पोस्ट व अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. दरम्यान, अशा पोस्ट तयार करून त्या व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांचे बारीक लक्ष असून अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com