
पिंपरी : इंग्रजी माध्यमाच्या शाळांबरोबरच आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून आता वाकड परिसरात ‘सीबीएसई’ शाळा सुरू करण्यात येत आहे. सध्या या सहामजली इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून ही शाळा सुरू होणे अपेक्षित आहे. या शाळांमध्ये गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळणार आहे. परिणामी, गेल्या अनेक वर्षांपासून ‘सीबीएसई’ शाळेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पालकांची प्रतीक्षा थांबणार आहे.