इंदोरीत भाजप 
कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

इंदोरीत भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

इंदोरी, ता. १० ः नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.९) सायंकाळी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर इंदोरीतील भाजप
कार्यकर्त्यांनी जयघोष करून व फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. यावेळी हनुमान मंदिराच्या प्रांगणात भाजप शहर अध्यक्ष मनोज पानसरे, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल ढोरे, महिला आघाडी अध्यक्षा सुरेखा शेवकर व युवती आघाडी अध्यक्षा कांचन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहून आनंदोत्सव साजरा केला.

तसेच, याप्रसंगी मावळ तालुका भाजप सरचिटणीस रामदास गाडे, माजी सरचिटणीस सुनील चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, माजी अध्यक्ष जगन्नाथ शेवकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दहा वर्षांतील देशसेवा व देशाची झालेली गतिमान प्रगती याबाबत सविस्तर माहिती दिली. पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत सेवाकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी मावळच्या सभापती ज्योतीताई शिंदे, तालुका सचिव नीलम पानसरे, सपना चव्हाण, ज्योती ठाकर, मनिषा शेवकर, संदीप नाटक, प्रवीण भापकर, साईनाथ बाणेकर, शाम पानसरे, नवनाथ पानसरे, विजय चव्हाण, संजय राऊत, विनोद भागवत, विष्णू शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com