
आकुर्डी : भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वेच्या संकल्पनेतून आकुर्डी रेल्वे स्थानकांच्या परिसरात ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू झाले आहे. नुकतेच त्याचे उद्घाटन झाले. शुक्रवारपासून नागरिकांच्या सेवेत हे रेस्टॉरंट रूजू झाल्याचे रेस्टॉरंट ऑन व्हीलचे संचालक नितीन चौघुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. एखाद्या राजवाड्याप्रमाणे त्याची रचना असून त्यामध्ये प्रवाशांना चोवीस तास खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.