
पिंपरी : महिलांसाठी गळ्यातील मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याचं लेणं असतं. सणवार असो, किंवा एखादा आनंद सोहळा, अशा कार्यक्रमांसाठी अलीकडे प्रत्येक महिला अभिमानाने वेगवेगळ्या डिझाइनचे मंगळसूत्र परिधान करतात. सध्या हेच दागिने चोरट्यांनी लक्ष्य केले आहेत. सणवारांच्या काळात शहराच्या अनेक भागांत सोनसाखळी चोरींच्या घटना वाढल्याचे दिसते. आता श्रावणाबरोबरच मंगळागौरीसह वेगवेगळे सोहळे होणार असल्याने सौभाग्याचं लेणं सांभाळावे लागेल.