

Chakan Industrial Area Workers Receive Diwali Bonus Up to 55000 Rupees as Companies Report No Signs of Slowdown
sakal
चाकण : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करत चाकण औद्योगिक वसाहतीत मंदीचे सावट नसल्याने कामगारांची दिवाळी गोड झाली आहे. येथील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कामगारांना ३० हजार ते ५५ हजार रुपयांपर्यंत बोनस जाहीर केल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे. यामुळे सणासुदीच्या काळात मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.