
Chakan Road Development
Sakal
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध रस्त्यांच्या कामांच्या निविदांची छाननी सुरू आहे. प्रशासकीय मान्यता मिळालेल्या रस्त्यांची एकूण लांबी ४०.७४ किलोमीटर आहे. त्यासह तब्बल ५५८ कोटी १२ लाख रुपये खर्चाची कामे पीएमआरडीएने हाती घेतली आहेत.