पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी पुन्हा प्रभारी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 December 2020

  • संतोष पाटील यांची बदली झाल्याने निर्णय; पवार यांच्याकडे जबाबदारी

पिंपरी : महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची पुणे विभागीय आयुक्तालयात पदोन्नतीने उपआयुक्त पदावर नियुक्ती झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचा अतिरिक्त पदभार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार यांच्याकडे सोमवारी सोपविला. त्यामुळे दोन वर्षांच्या कार्यकाळानंतर अतिरिक्त आयुक्त पदावार पुन्हा प्रभारी कारभारी नियुक्त झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी असताना संतोष पाटील यांची 29 सप्टेंबर 2018 रोजी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त (एक) पदावर नियुक्ती झाली होती. मात्र, सुमारे एक महिन्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला होता. सध्या महापालिकेत अतिरिक्त आयुक्त दर्जाची तीन पदे मंजूर आहेत. त्यातील एक क्रमांकाच्या पदाचा कारभार पाटील यांच्याकडे होता. दोन क्रमांकाच्या पदावर अजित पवार यांची सरकारकडून नियुक्ती झालेली आहे. तिसरे अतिरिक्त आयुक्तपद महापालिका सेवेतील अधिकाऱ्यांकडून भरले जाते. मात्र, त्या दर्जाचा कोणीही अधिकारी नसल्याने तूर्त सहशहर अभियंता प्रविण तुपे यांच्याकडे पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता पाटील यांच्या जागेवर नवीन नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पवार यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अतिरिक्त ठिकेनात 
गेल्या चार वर्षांपासून पूर्ण कालावधीसाठी अतिरिक्त आयुक्त टिकत नाहीत, अशी स्थिती आहे. कारण एक जून 2017 रोजी अच्युत हांगे यांची नियुक्ती झाली होती. मात्र, केवळ चार महिन्यांत 25 ऑक्‍टोबर रोजी त्यांची बदली झाली होती. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तपद रिक्त होते. काही महिन्यांनी सहायक आयुक्त प्रविण अष्टीकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर संतोष पाटील यांची नियुक्ती झाली. अवघ्या दोन वर्षांत त्यांची बदली झाली. आता नविन अतिरिक्त कोण? याची प्रतीक्षा आहे. 

आयुक्तांच्या बदलीची चर्चा 
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बदलीची पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाल मार्चमध्येच संपला आहे. आता पुढील वर्ष पदोन्नती मिळूनच त्यांची बदली होईल, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In-charge aof Additional Commissioner of Pimpri-Chinchwad Municipal Corporation