esakal | मास्क न लावल्याने पिंपरी-चिंचवड महापौरांच्या मुलावर गुन्हा!

बोलून बातमी शोधा

मास्क न लावल्याने पिंपरी-चिंचवड महापौरांच्या मुलावर गुन्हा!}

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी (ता. २२) सायंकाळी ‘मिस पिंपरी-चिंचवड सौंदर्य’ स्पर्धेचे आयोजन केले होते.

pimpri-chinchwad
मास्क न लावल्याने पिंपरी-चिंचवड महापौरांच्या मुलावर गुन्हा!
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी (ता. २२) सायंकाळी ‘मिस पिंपरी-चिंचवड सौंदर्य’ स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यास महापौर उषा ढोरे यांच्यासह भाजपच्या काही नगरसेविकासुद्धा उपस्थित होत्या. महापौरांचा मुलगा जवाहर मनोहर ढोरे (रा. सांगवी) यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये प्रशासनाच्या सूचनांप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही, बऱ्याच लोकांनी मास्क लावले नव्हते. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहरात मास्क सक्तीचे केले आहे. रात्री अकरानंतर संचारबंदी लागू आहे. कार्यक्रमांना केवळ दोनशे व्यक्ती किंवा सभागृहाच्या पन्नास टक्के क्षमतेइतक्या उपस्थितीला मुभा दिली आहे. त्यासाठीही महापालिका व पोलिसांची परवानगी आवश्‍यक आहे. आमदार जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त जवाहर ढोरे यांनी चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी ‘मिस पिंपरी-चिंचवड सौंदर्य’ स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यास सभागृहाच्या क्षमतेपेक्षा अधिक जण उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. महापौरांसह अनेकांनी मास्क लावलेले नव्हते. या बाबत आयुक्तांच्या आदेशानुसार कर्मचारी महादेव शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. घटना स्थळाला वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर काटे व पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्‍वजित खुळे यांनी भेट दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापौरांनी भरला दंड 

महापौर उषा ढोरे यांच्यासह अनेकांनी मास्क लावलेले नव्हते. त्याबद्दल महापालिका आरोग्य विभागाने त्यांच्याकडून पाचशे रुपये दंड वसूल केला. याचीच चर्चा बुधवारी महापालिकेत होती. या बाबत महापौर ढोरे म्हणाल्या, ‘‘कार्यक्रम मी आयोजित केलेला नव्हता. कार्यकर्त्यांनी दंड भरला असेल. तुम्ही त्यांच्याकडे चौकशी करा.’’